रेणापुर येथे आंबेडकर जंयती निमित्त सप्तखंजेरीवादक पवनपाल महाराज यांचा कार्यक्रम…..
भोकर प्रतिनिधी:- भोकर तालुक्यातील रेणापुर गावामध्ये दि.23 एप्रील 2026 रोजी गुरुवारी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जंयती साजरी होत आहे.त्यानिमित्त दि.23 एप्रील रोजी सकाळी 8:30 वा.पंचशील ध्वजारोहन होईल त्यानंतर प्रमुख मान्यवरांची भाषने होतील.व लगेच अन्नदान होईल.त्यानंतर दुपारी 4:00 वा.गावातील प्रमुख रस्त्याने महात्मा गौतंम बुद्ध,व महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणुक गावातील प्रमुख रस्त्याने निघेल मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांचा लेझीमं पथकाचा कार्यक्रम होईल,त्यानंतर रात्री ठिक 8:00 वाजता सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य प्रबोधनकार,सप्तखंजेरीवादक पवनपाल महाराज वडाळीकर ता.अकोट यांचा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम होईल.तरी भोकर तालुक्यातील सर्व बांधवानी या कार्यक्रमाला यावे असे भिमं जंयती मंडळा कडुन व गावकरी मंडळी रेणापुर यांच्याकडुन विंनती करन्यात येते.या कार्यक्रमाचे आयोजन अजिठा बौद्ध विहार समीती रेणापुर,भिमं जंयती मंडळ रेणापुर यांच्या वतीने करन्यात आले आहे.
