आदिवासी कातकरी मुला मुलींची अनुदानित आश्रमशाळा बाबरे, ता. शहापूर शाळेचा एस.एस.सी बोर्ड परीक्षेमध्ये ९३ % निकाल

Adiwasi kranti Marathi news portal

( प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला यामध्ये शहापुर तालुक्याचा निकाल ९३.५२ टक्के इतका लागला आहे. तर आदिवासी कातकरी मुला मुलींची अनुदानित आश्रमशाळा बाबरे, ता. शहापूर या शाळेचा मार्च २०२३ चा एस.एस.सी बोर्ड परीक्षेमध्ये ९३ % निकाल लागून या शाळेने यश मिळवले आहे.
शासनाने कमी साक्षरता असलेल्या जमातीचे सर्वेक्षण करून ए.बी.एम समाज प्रबोधन संस्थेला खास आदिवासी कातकरी मुला मुलींच्या शिक्षणासाठी अनुदानित आश्रमशाळा मंजूर केली. कोरोना कालावधीमध्ये नवीन शाळा असतानाही शिक्षक वाड्या वाड्यांवर जाऊन शिकविण्याचे काम करत होते. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून ऑनलाइन लेक्चर सुद्धा घेत होते, त्यामुळे सन २०२२-२००२३ मध्ये इ. १ ली ते १० वी पर्यंतच्या ३३९ कातकरी मुला मुलींनी प्रवेश घेतला. एस.एस.सी. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आज जाहीर झालेल्या निकालामध्ये ९३ % यश मिळविले. संपूर्ण परिसरामध्ये प्रामुख्याने आदिवासी बांधवांमध्ये, शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका आशा नवनाथ रणखांबे व सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती तसेच अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. विशेष म्हणजे या संस्थेच्या अन्य दोन शाळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा शिरोळे तालुका भिवंडीचा निकाल ९०.६२% तसेच छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय धामणगाव तालुका भिवंडीचा निकाल ९०% लागला असून एस.एस.सी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Google Ad