वसमत शहरात रेल्वे स्टेशनवर अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड व शासकीय मालमत्तेचा नुकसान आरोपीवर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही..

वसमत रेल्वे अधिकारी व रेल्वे समितीचे हिंगोली वसमत चे सदस्यांनी या गंभीर मुद्द्याकडे लक्ष द्यावे.

(हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी)

वसमत शहरातील रेल्वे स्टेशनवर दि. 12 जुन रात्री 9/30 वाजता काही अज्ञात गुंड प्रवत्तीचे व्यक्तीनी मद्यपान करूण स्टेशन वर तोडफोड करत दहशत निर्माण केली .त्यांनी रेल्वे स्टेशन मध्ये वेटिंग हॉल दरवाजा फोडुन शासकीय मालमत्तेचा नुकसान केले. यापूर्वी ही अशा घटना रेल्वे स्टेशन घडलेल्या आहेत. गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या गुंड प्रवत्ती च्या अज्ञात व्यक्तींचा रेल्वे पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त करणे आवश्यक आहे.शहरातील रेल्वे प्रवाशात रात्रीच्या वेळी भीतीचे वातावरण असते. मोबाईल चोरी, पाकीट मार , लुटमार , मारामारी या घटनासह शासकीय मालमतेचे नुकसानी च्या घटना घडत असतात त्यांच्या वर कार्यवाही न झाल्या मूळे त्यांचे मनोबल वाढून आमचे कोणीच काही करू शकत नाही अशी त्यांची माणसिकता झाली असुन त्यांच्या वर कडक कार्यवाही करूण त्यांचा गैरसमज दुर करणे आवश्यक आहे . प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काही अनुचित प्रकार घडू नये या करिता रेल्वे स्टेशनवर सिसिटिव्ही कॅमेरे लावावे सक्षम सिक्युरिटी गार्ड तैनात करावेत व आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी रेल्वे अधिकारी व रेल्वे समितीची हिंगोली चे वसमत चे पदाधिकारी यांना विनंती आहे
या घटने संदर्भात पत्रकार मोईन कादरी यांनी स्टेशन इनचार्ज यांच्या शी वार्ता केली असता रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनेची चौकशी करूण कार्यवाही करतील अशी माहीती दिली .

Google Ad