सराईत गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या टोळी विरुध्द मा.पोलीस अधीक्षक हिंगोली यांची कडक कार्यवाही
कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये वसमत शहरातील ०२ गुन्हेगारांना केले ०२ वर्षाकरीता हिंगोली जिल्हयातुन केले हद्दपार..
मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली जी.श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालविणाऱ्या विरुध्द तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विरुध्द कडक कार्यवाहीची भुमिका असे गुन्हे सराईत करणाऱ्या विरुध्द प्रभावी प्रतिबंध कार्यवाही केली जात आहे.
पोलीस अधीक्षक साहेब, जी. श्रीधर यांनी आज पो.स्टे. बसमत शहर हद्दीत राहणारे सतत सराईत गुन्हेगार १) शेख शादुल शेख खय्युम वय ३२ वर्ष रा. मुशाफिरशहा मोहल्ला, वसमत ता. वसमत २) सय्यद इमरान सय्यद फारुख वय २९ वर्ष रा. आसार मोहल्ला ता. वसमत यांचे विरुध्द पोलीस स्टेशन वसमत शहर व इतर ठिकाणी मालाविरुध्दचे ०४ गुन्हे दाखल असून गुन्हे संघटीतपणे दाखल आहेत. व त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांचे अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालीमुळे परिसरातील नागरीकांच्या मालाविरुध्द धोका उत्पन्न होत असल्याने मा. पोलीस अधीक्षक , हिंगोली यांनी सदर प्रकरणी कडक प्रतिबंध कार्यवाही बाबत आदेश दिल्यावरुन एस.बी. भोसले पोउपनि पो.स्टे. वसमत शहर यांनी नमुद आरोपीतां विरुध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची सविस्तर तपासणी करुन मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अन्वये नमुद ०२ आरोपींना आज पासून पुढील ०२ (दोन) वर्षा करीता हिंगोली जिल्हयातुन हद्दपार केले बाबत आदेश काढले आहेत.
मा. पोलीस अधीक्षक, जी. श्रीधर यांनी समाजात शांतता नांदावी म्हणून सराईत गुन्हेगारांची माहिती घेवून त्यांचे बाबत कोम्बीन व ऑलआउट ऑपरेशन मधुन त्यांची नियमित तपासणी तसेच त्यांचे बाबत कडक प्रतिबंधक कार्यवाही करीत आहेत.