वसमत पठाण मोहल्यात सासरच्या जाचाला कंटाळून तीन महिन्याची गरोदर महिलेची आत्महत्या

वसमत येथील पठाण मोहल्यात सासरच्या लोकांनी सुनेला आत्महत्तेस प्रवृत्त केल्या मुळे तिने जाचा ला कंटाळून दि 14/4 /024 रोजी गळफास घेऊण पोटातल्या गर्भा सह स्वःताची जीवन यात्रा संपवीली . वसमत शहर पोलीस स्टेशन मधे नवरा, सासु ,सासऱ्या गुन्हा दाखल झाला.
या बाबत शेख फैसल शेख शौकत हुसेन रा. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार सविस्तर वृत असे आहे की , मयत शेख हिना सुलताना शेख जाहेद रा पठाण मोहल्ला हिचा तु माहेरून 2 लाख रुपये ऑटो घेण्यासाठी घेऊण ये म्हणुन वारंवार छळ केला माहेरच्या लोकांनी लेकी च्या सुखी संसारासाठी वेळोवेळी फोन पे द्वारे पैसे पुरवुन ही त्यांची पैस्याची भुख वाढत गेली. तसेच तुला स्वयंपाक येत नाही , धुने धुता येत नाही , भांडे घास्ता येत नाही असे म्हणुन तिला छळले या शारीरीक , माणसीक जाचा ला कंटाळुन मयत हिना ने तिन महीण्याची गरोदर असताना दि14रोजी रात्री 10 :30 वा राहत्या घरी गळफास घेऊण आत्महत्या केली. म्हणुन आत्महत्येस प्रवत्त केल्या बदल तिचा नवरा शेख जाहेद शेख अब्दुल बारी , सासु शेख रेहना अब्दुल बारी , सासरा शेख अब्दुल बारी यांच्या वर कलम 306 ,498 (अ) 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करन्यात आला असुन पोलिस निरिक्षक वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उप निरिक्षक श्री आरआर. महीपाळे पुढील तपास करत आहेत .

Google Ad