भोकर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा.स्वातंत्र्यसेनानी डॉ.दासराव साकळकर असा झाला नामांतरण सोहळा …
भोकर( तालुका प्रतिनिधी) राज्य शासनाच्या कौशल्य विभाग मंत्रालयाच्या निर्णयानुसार भोकर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ. दासराव साकळकर असा नामांतरण सोहळा माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते 27 जानेवारी 2025 रोजी पार पडला.
महायुती सरकारने राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना त्या तालुक्यातील सामाजिक व कर्तृत्ववान व्यक्तीचे नाव देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार भोकर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा सामाजिक कार्यातील अग्रणी व्यक्तिमत्व डॉ. दासराव साकळकर यांचे नाव देण्याचा अध्यादेश 15 जानेवारी रोजी काढला होता त्यानुसार 27 जानेवारी 2025 रोजी स्वातंत्र्य सेनानी डॉ. दासराव साकळकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोकर असा नामांतरण सोहळा माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, आमदार श्रीजया ताई चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. डॉ. दासराव साकळकर यांचे सामाजिक योगदान मोठे आहे त्यांनी लोकांची सेवा केली भोकर साठी ही अभिमानाची बाब असल्याचे मत खा. चव्हाण यांनी व्यक्त केले, रामकृष्ण साकळकर यांनी आपल्या मनोगतात शासनाचे आभार मानले मुकुंद साकळकर यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला यावेळी समितीचे बालाजी कंटेवाड, सुदाम पाटील, गोविंदराव उल्लेवाड, गोविंदराव शिंदे नागेलीकर, गणेश पा. कापसे,भगवानराव दंडवे, जगदीश पा.भोसीकर, विनोद पा. चिंचाळकर, रामचंद्र मुसळे, गणपत पिटेवाड, मिलिंद साकळकर यांच्यासह साकळकर परिवाराचे सदस्य नागरिक प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते